Tuesday, May 20, 2025

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया.


२१ मे सकाळी ११:०० ते २८ मे २०२५ सायं. ६:०० प्रत्यक्ष नोंदणी व कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती क्रम नोंदवणे विद्यार्थ्यांनी किमान १ आणि कमाल १० कनिष्ठ महाविद्यालय पसंती नोंदणी करणे.

Maharashtra FYJC Admission 2025: राज्यातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये आता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ८ मे पासून सुरू झाली आहे. विद्यार्थी १९ ते २८ मे पर्यंत अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क आहे. प्रवेशासाठी हेल्पलाइन क्रमांक व ईमेल आयडी देण्यात आले आहेत. साधारणतः ११ ऑगस्टला कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रक्रिया १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.








प्रवेश प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा काय असतील ?
सध्या महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी करून, अर्ज भरण्याचा कालावधी १९ ते २८ मे राहणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 👆 या वेबसाइटचा वापर करावा लागेल. विद्यार्थ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी इतर बनावट वेबसाइटपासून दूर राहण्याची गरज आहे. अर्ज भरण्यासाठी नोंदणी शुल्क केवळ १०० रूपये लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरी, चार सामान्य फेऱ्या व विशेष फेरी अशा फेऱ्या राहणार आहेत. त्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.











ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना काय फायदा होईल ?
या प्रवेश प्रक्रियेत भरपूर सुलभता आहे. त्यामुळे विद्यार्थी मुदतीत कुठेही आणि केव्हाही अर्ज करू शकतात. त्यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असल्याने कोणताही पक्षपात किंवा गैरव्यवहार टाळता येतो. कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाइटमध्ये आवश्यक माहिती, सूचना आणि सुधारणा वेळोवेळी मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्याला कॉलेजांच्या प्राधान्यक्रमाची निवड करता येते. विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार कॉलेज निवडू शकतात आणि बदलही करू शकतात. कागदपत्रांचे दस्तऐवज अपलोड करणे सोपे आहे. मूळ कागदपत्रांची फोटोकॉपी घेऊन जाण्याची गरज नाही. केवळ स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करता येतात. एकाच पोर्टलवर सर्व माहिती म्हणजेच एकाच ठिकाणी अर्ज, कॉलेज माहिती, वेळापत्रक, फेऱ्यांचे निकाल सर्वकाही उपलब्ध असते. या प्रक्रियेत आपोआप गुणवत्ता यादी तयार होणार आहे. त्यामुळे गुणांनुसार प्रवेश निश्चित केला जातो. या प्रक्रियेतून प्रवेशासाठी निकोप स्पर्धा आणि न्यायाची संधी मिळते.


No comments:

Post a Comment