२१ मे सकाळी ११:०० ते २८ मे २०२५ सायं. ६:०० प्रत्यक्ष नोंदणी व कनिष्ठ महाविद्यालयांची पसंती क्रम नोंदवणे विद्यार्थ्यांनी किमान १ आणि कमाल १० कनिष्ठ महाविद्यालय पसंती नोंदणी करणे.
Maharashtra FYJC Admission 2025: राज्यातील ज्युनिअर कॉलेजांमध्ये आता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रक्रिया ८ मे पासून सुरू झाली आहे. विद्यार्थी १९ ते २८ मे पर्यंत अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्यासाठी १०० रुपये शुल्क आहे. प्रवेशासाठी हेल्पलाइन क्रमांक व ईमेल आयडी देण्यात आले आहेत. साधारणतः ११ ऑगस्टला कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे. प्रवेश प्रक्रिया १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
सध्या महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी करून, अर्ज भरण्याचा कालावधी १९ ते २८ मे राहणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 👆 या वेबसाइटचा वापर करावा लागेल. विद्यार्थ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी इतर बनावट वेबसाइटपासून दूर राहण्याची गरज आहे. अर्ज भरण्यासाठी नोंदणी शुल्क केवळ १०० रूपये लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरी, चार सामान्य फेऱ्या व विशेष फेरी अशा फेऱ्या राहणार आहेत. त्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.