Maharashtra FYJC Admission 2026:
- भाग १ आणि भाग २ चे अर्ज भरताना एसएससी बोर्डाची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नाही.
- CAP फेरी १ – भाग १ आणि भाग २, CAP आणि कोटा पर्याय अर्ज भरणे, विद्यार्थी नोंदणीसह, २१ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून सुरू होईल आणि २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू राहील.
प्रवेश प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा काय असतील ?
- भाग १ आणि भाग २ चे अर्ज भरताना एसएससी बोर्डाची गुणपत्रिका आणि शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नाही.
- CAP फेरी १ – भाग १ आणि भाग २, CAP आणि कोटा पर्याय अर्ज भरणे, विद्यार्थी नोंदणीसह, २१ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजल्यापासून सुरू होईल आणि २३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत सुरू राहील.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना काय फायदा होईल ?
या प्रवेश प्रक्रियेत भरपूर सुलभता आहे. त्यामुळे विद्यार्थी मुदतीत कुठेही आणि केव्हाही अर्ज करू शकतात. त्यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असल्याने कोणताही पक्षपात किंवा गैरव्यवहार टाळता येतो. कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाइटमध्ये आवश्यक माहिती, सूचना आणि सुधारणा वेळोवेळी मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्याला कॉलेजांच्या प्राधान्यक्रमाची निवड करता येते. विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार कॉलेज निवडू शकतात आणि बदलही करू शकतात. कागदपत्रांचे दस्तऐवज अपलोड करणे सोपे आहे. मूळ कागदपत्रांची फोटोकॉपी घेऊन जाण्याची गरज नाही. केवळ स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करता येतात. एकाच पोर्टलवर सर्व माहिती म्हणजेच एकाच ठिकाणी अर्ज, कॉलेज माहिती, वेळापत्रक, फेऱ्यांचे निकाल सर्वकाही उपलब्ध असते. या प्रक्रियेत आपोआप गुणवत्ता यादी तयार होणार आहे. त्यामुळे गुणांनुसार प्रवेश निश्चित केला जातो. या प्रक्रियेतून प्रवेशासाठी निकोप स्पर्धा आणि न्यायाची संधी मिळते.

No comments:
Post a Comment